नर्मदालयाच्या वसतिगृहात मध्य प्रदेशतील अलिराजपूर, बडवानी आणि खरगोन या जिल्ह्यातील साठ वनवासी विद्यार्थी राहतात. यापैकी अलिराजपूर आणि बडवानी जिल्ह्यातील मुले नर्मदा परिक्रमा मार्गातील प्रसिद्ध अशा ‘शूलपाणी की झाडी’ च्या सातपुडा आणि विंध्याचल पर्वताच्या अतिदुर्गम भागातील आहेत. तिथे सरकारी शाळा आहेत पण शाळेच्या फक्त इमारतीच अनेकदा बघायला मिळतात. अनेक ठिकाणी पाचवी किंवा आठवीपर्यंतच शाळा आहेत. त्यामुळे शिक्षक स्वत:च्या मुलांच्या शिक्षणासाठी तिथे राहू इच्छित नाहीत...